Daily Steps: वयाप्रमाणे रोज किती पावले चालणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Dhanshri Shintre

चालणे

चालणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. आजकाल अनेक गॅझेट्समध्ये स्टेप काऊंटर असतो आणि मोबाईल अॅपद्वारे रोजच्या पावलांची माहिती मिळते.

चालावयाची पावले

तुम्हाला माहित आहे का, वेगवेगळ्या वयोगटासाठी रोज चालावयाची पावले वेगवेगळी असतात आणि त्यांचे टार्गेटही भिन्न असते.

टार्गेट

हेल्थ तज्ज्ञांनी ६ ते ६५ वर्ष वयोगटातील लोकांसाठी रोज चालण्याची शिफारस केलेली पावले आणि टार्गेट स्पष्ट केले आहेत.

६ ते १७ वर्ष

६ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांनी शरीराच्या योग्य विकासासाठी दररोज साधारण ११ ते १३ हजार पावले चालणे आवश्यक आहे.

शारीरिक आणि मानसिक विकास

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी त्यांना पुरेशी खेळाची संधी दिली पाहिजे, ज्यामुळे शरीर आणि मेंदू योग्यरीत्या वाढेल.

१८ ते ६४ वर्ष

१८ ते ६४ वयोगटातील युवक आणि वृद्धांनी आरोग्य टिकवण्यासाठी दररोज साधारण १०,००० पावले चालणे आवश्यक आहे.

६५ वर्षानंतर

६५ वर्षानंतर दररोज ६ ते ८ हजार पावले चालल्यास आरोग्यासाठी पुरेसे मानले जाते आणि शरीर सक्रिय राहते.

वृद्ध लोक

वृद्ध लोकांनी रोज कमीतकमी ६ ते ८ हजार पावले किंवा त्याहून कमी चालले तरी त्यांचे आरोग्य टिकून राहते.

फिरण्याचा आनंद घ्यावा

फक्त पावले मोजण्यापेक्षा चालताना निसर्ग अनुभवावा आणि फिरण्याचा आनंद घ्यावा, तेव्हाच शरीर आणि मनाला खरी ताजगी मिळते.

NEXT: प्रोटीनची गरज आहे? फक्त मांसाहार नाही, 'या' ५ सुपरफुड्समधून मिळवा जास्त प्रोटीन

येथे क्लिक करा