Manasvi Choudhary
पावसाळ्यात केसांची निगा राखणे अत्यंत गरजेचे असते. अनेक महिला व मुली या नियमितपणे केस धुतात.
नियमितपणे केस धुताना तुम्हीही रोजच शॅम्पू लावताय तर ही माहिती वाचा
रोज केसांना शॅम्पू लावल्याने केसांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
केसांना नियमितपणे शाम्पू लावल्याने केसांतील नैसर्गिक तेल कमी होऊन केस कोरडे होतात.
आठवड्यातून २ किंवा ३ वेळा केस शाम्पूने धुवा. केसांच्या मुळाशी नैसर्गिक तेल असते. शाम्पूचा अति वापर केल्यास हे तेल कमी होते आणि केस कोरडे होतात.
जास्त शाम्पूमुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते, कारण त्यामुळे केस कमजोर होतात.
शाम्पूमुळे केसांतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू शकतात.
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शाम्पूचा वापर ठरवा. जर तुमचे केस तेलकट असतील तर तुम्ही थोडे जास्त वेळा शाम्पू वापरू शकता
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.