Saam Tv
जोडीदाराची अपेक्षित साथ आज लाभणार आहे. रखडलेली कामे सुद्धा मार्गी लावू शकाल. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. कोर्टात यश मिळेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. धावपळ, दगदग होईल पण त्यातून मार्गही काढाल.
सुनामुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. नवीन दिशा, नवीन आशा आणि नवा मार्ग आज सापडेल. आपल्या गोड वक्तृत्वाने इतरांना जवळ कराल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागतील. अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. काही कामे धाडसाने पार पाडाल. अगदी आलेल्या अडचणीवर सिंहासारखे तुटून पडाल असे म्हणायला हरकत नाही.
व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहिल्यामुळे दिवस आनंदी आनंद असाच म्हणावा लागेल.
आपले आरोग्य आज उत्तम राहील. मनाने केलेल्या गोष्टी सहजतेने यशाकडे वाटचाल कराल. तुमचा
इतरांवर चांगला प्रभाव राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी न टाळण्यासारखे असतील. पैसे, तब्येत यामुळे मनोबल सुद्धा कमी राहील.
महत्वाचे पत्रव्यवहार आज पार पडतील. आपले परिचय वाढतील या परिचयांमधून अनेक लाभ होण्याची आज दाट शक्यता आहे.
तुमच्या कार्यक्षेत्रात मान सन्मान आणि प्रतिष्ठा लाभण्याचाच दिवस आहे. शासकीय कामे योग्य प्रकारे मार्गी लागतील.
एखादी भाग्यकारक घडण्याचा आजचा दिवस आहे. तुमचे निर्णय आणि घेतलेले अंदाज अचूक ठरतील. शिव उपासना करावी.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा आज करू नका. विनाकारण कटकटी वाढत्या राहतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.