Saam Tv
कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील. गोष्टी ठरवून करू नका, पण इतरांचे सल्ले विचारात घ्यायला हरकत नाही. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागाल.
आजोळी प्रेम संबंध वृद्धिंगत होतील. मात्र चोर चोरी आणि आपल्या महत्त्वाच्या जिन्नस आणि ऐवजांची आज काळजी घ्यावी.
लॉटरीमध्ये नशीब आजमावायला आज हरकत नाही. विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल. दिवस चांगला जाईल.
आज कुणीतरी यावे असा आजचा दिवस आहे. मनामध्ये वाटणाऱ्या घटना तशाच घडतील. जवळच्या व्यक्ती घरी येतील.
पाठीवर भावंडांची शाब्बासकीची थाप मिळेल आणि कामाला नवीन उत्साह आणि जोम येईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडण्याचा आजचा दिवस आहे.
गुंतवणूकीसाठी दिवस संधी घेऊन आलेला आहे. घरामध्ये छोटेसे धार्मिक कार्य होईल. आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण कुटुंबात असेल.
नव्याने खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. मग वस्त्र असो अलंकार असो घरातील वस्तू असो. उनाड दिवस असा आजचा दिवस राहिल.
"मन चिंती ते वैरी ना चिंती" असा आजचा दिवस आहे. केलेले सर्व फळ मिळेल पण उशिरा. पैशाला वाटा फुटतील.
मैत्रीसाठी काही धाडसाचे, धडाडीचे निर्णय घ्याल. जवळचा लहानपणीचा मित्र भेटण्याची दाट शक्यता आहे. स्नेहभोजनाचे योग येतील.
समाजकारण आपल्याला आवडतेच. इतरांनी उचलून धरल्यामुळे नवीन उत्साह आणि उभार आज येईल. कार्यक्षेत्री धावपळ राहील. दिवस चांगला आहे.
शिव, विष्णू उपासना आज फलदायी ठरेल. नव्या काही गोष्टी आयुष्यात येतील आणि त्याचा सहज मार्गही सुकर होईल. देवाने दिलेल्या गोष्टींविषयी विशेष आभार वाटेल.
जोडीदाराकडून आज पैशाचे योग आहेत. इच्छा कराल ते मिळेल पण त्यासाठी नैतिकता सोडून राहू नका. दिवस संमिश्र जाईल.