Horoscope Today : तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

आपल्या पितरांच्या श्राद्ध केल्यास आयुष्यातील योग्य दिशा मिळेल. धनाशी निगडित अडचणी दूर होतील.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आजच्या दिवसांमध्ये यशाचे योग दिसत आहेत. आपला सकारात्मक स्वभाव इतरांना भावून जाईल.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आज तुम्ही कितीही प्रेमाने वागले तरी इतरांकडून तुमचे मन दुखावले जाऊ शकते. त्यामुळे आधीच काळजी घेऊन मनस्ताप टाळा.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

तुमच्यासाठी आजचा दिवस चढउताराचा असेल. काही ठिकाणी लाभ तर काही ठिकाणी पाय गोत्यात येतील.

कर्क राशी | Saam TV

सिंह

नोकरी अन् व्यवसायात आगेकूच दिसेल. ठरवलेल्या सर्व गोष्टी मनाप्रमाणे तशाच होतील.

सिंह राशी | Saam TV

कन्या

देवाची उपासना आणि पितरांचे श्राद्ध केल्यास आपल्या भागातील अडथळे दूर होतील. भाग्यकारक घटना नक्कीच घडतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

व्यापार व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. पण तेवढ्याच मोठ्या रिस्क सुद्धा घ्याव्या लागतील. कायद्याच्या विरोधात जाऊ नका.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आजच्या दिवसामध्ये कामाचा वेग अखंड असेल. कदाचित आपल्या स्वभावामुळे कोर्टकचेरीच्या कटकटी मागे लागतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

चोर अन् चोरी अशा घटनांचा अशा गोष्टींचा ससेमीरा मागे लागू शकतो. त्यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू आणि जिन्नस सांभाळा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

प्रेमामध्ये यश मिळण्याचा आज दिवस आहे. विद्यार्थी वर्गाच्या बाजूने काही गोष्टी सहज घडतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

घरात नवीन कार्यक्रम होण्याचे योग आहे. त्यामुळे पाहुण्यांचे आगमन होईल. सर्वांबरोबर असून सुद्धा अलिप्त वाटू शकते.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आयुष्यामध्ये मोठी घोडदौड हवी असेल तर आज दोन पाऊले मागे या. उगाच कोणत्याही गोष्टींच्या खपल्या काढू नका.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : मनाला वेड लावणारे सौंदर्य, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पाहिलात का?

konkan | SAAM TV
क्लिक करा