Manasvi Choudhary
सफरचंद आरोग्यासाठी सूपरफूड मानले जाते. निरोगी राहायचं असेल तर सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का? दररोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?
सफरचंदामध्ये जीवनसत्त्वे , खनिजे , फायबर आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक ते पौष्टिक गुणधर्म मिळतात.
सफरचंदामध्ये फायबरचे घटक पोटातील गुड बॅक्टेरिया वाढतात यामुळे पोटातील जळजळ, अपचन, बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनसंस्था मजबूत राहते.
सफरचंदात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळे दररोज एक सफरचंद खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
सफरचंदातील फायबर आणि पॉलिफेनल्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.