Shreya Maskar
दह्याची कढी बनवण्यासाठी दही, बेसनाचे पीठ, हळद, पाणी, तेल, जिरे , मोहरी, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, साखर, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
दह्याची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसनाचे पीठ, हळद घालून घुसळून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
मिश्रणात आलं, लसणाची पेस्ट घालून एकजीव करून घ्या.
मिश्रण चांगले ढवळून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ, हळद घाला.
कढीला उकळी येईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या.
शेवटी कोथिंबीर टाकून दह्याची कढी सर्व्ह करा.
तडक्यासाठी पॅनमध्ये तेल, मोहरी, जिरे, लाल मिरची टाकून मिक्स करा.