Manasvi Choudhary
मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. गोविंदा पथकांमध्ये दही हंडी फोडण्याचा उत्साह आणि आनंद आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदामध्ये संपूर्ण दिवसभर ताकद आणि उर्जा असणे महत्वाचे आहे.
दिवसभर पावसात भिजणे, धावपळ करणे आणि कसरत करताना शरीरातील ऊर्जा कमी होऊ नये, यासाठी खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
दहीहंडी पथकात सहभागी गोविदांनी केळी खाणे महत्वाचे आहे. . केळीमध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम असते, जे शरीराला ऊर्जा देते. पायांमध्ये गोळे आणि थकवा येत नाही.
गोविंदामध्ये सहभागी मुलांनी खजूर खा. खजूर खाल्ल्याने शरीरातील उर्जा आणि ताकद मिळते.
मखाने आणि ड्रायफ्रुट्समध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते. मखाने खाल्ल्याने पोट भरलेले राहते. थकवा येत नाही.
दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी साध्या पाण्याऐवजी लिंबू पाणी, कोकम सरबत प्या.
गोविंदांनी नारळ पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि चक्कर येत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.