Shreya Maskar
सध्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र ओले चिंब रस्ते आणि हिरवळ पाहायला मिळत आहे.
पालघरचे सौंदर्य पावसाळ्यात आणखी खुलले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये असणारा दाभोसा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.
दाभोसा धबधब्याचे पाणी जेवढ्या वेगाने आणि उंचीवरून खाली पडते, तितक्याच वेगाने त्याचे तुषार अंगावर उडतात आणि आपल्याला भिजवून टाकतात.
ट्रेकिंगसाठी दाभोसा धबधबा हे ठिकाण लोकप्रिय आहे.
डोंगराच्या कुशीत दाभोसा धबधबा वसलेले आहे.
दाट धुके आणि कोसळणारा पांढराशुभ्र फेसाळलेला दाभोसा धबधबा हे पालघरचे आकर्षण आहे.
दाभोसा धबधबा बाराही महिने सुरू असतो.
चारही बाजूने डोंगर दऱ्यांनी वेढलेला, जंगल, शांतता आणि पाण्याचा खळखळाट हे विलोभनीय दृश्य पाहायला पर्यटक आतुर असतात.