Shruti Vilas Kadam
सायकलिंग आणि वेगाने चालणे दोन्ही कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. नियमित व्यायामासोबत योग्य आहार घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
दोन्ही व्यायाम हृदयाची कार्यक्षमता वाढवतात आणि नियमित केल्यास कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारण्यास मदत होते.
सायकलिंगमध्ये मांडी, पोटऱ्या आणि ग्लूट्सवर परिणाम होते, तर चालण्याने पायांच्या स्नायूंना सातत्यपूर्ण व्यायाम मिळतो.
चालणे हा वजन पेलणारा व्यायाम असल्याने हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सायकलिंगमध्ये सांध्यांवर तुलनेने कमी ताण येतो.
दोन्ही प्रकारच्या व्यायामामुळे शरीर सक्रिय राहते आणि मूड सुधारण्यास मदत होते. नियमित चालणे किंवा सायकलिंग मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
वेगाने सायकल चालवल्यास कमी वेळेत चांगला कार्डिओ व्यायाम मिळू शकतो. त्यामुळे ज्यांना जास्त वर्कआउट आवडतो त्यांच्यासाठी सायकलिंग चांगला पर्याय आहे.
चालण्यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नसते आणि वॉक कुठेही करता येतो. रोज 30–45 मिनिटे वेगाने चालणे हा सोपा पर्याय आहे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.