Shreya Maskar
सीताफळ हे चवीला गोड आणि आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे. सीताफळाच्या गरामध्ये नैसर्गिक ओलावा देणारे घटक असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
सीताफळापासून घरच्या घरी फेस स्क्रब तयार करता येतो. सीताफळाच्या गरामध्ये पाणी आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे तो त्वचेला मऊपणा देऊ शकतो.
सर्वप्रथम पिकलेले सीताफळ घेऊन त्याची साल आणि बिया पूर्णपणे वेगळ्या करा. सीताफळाचा गर एका स्वच्छ भांड्यात घ्या. त्यामध्ये बारीक ओट्स पावडर आणि मध मिसळा.
सर्व साहित्य एकत्र करून मऊसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. कोणतीही जळजळ किंवा खाज जाणवत नसेल तर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. १०-१५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. सीताफळाच्या बिया चेहऱ्यावर अजिबात चोळू नका. लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा मिसळू नका. मिश्रण डोळ्यांच्या आसपास लावू नका. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच धुऊन टाका.
महिन्यातून १ - २ वेळा तुम्ही सीताफळाच्या फेस स्क्रब वापरू शकता. चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने वारंवार स्क्रब करणे टाळावे. कोरडी, संवेदनशील किंवा मुरुम येणारी त्वचा असल्यास स्क्रबमुळे त्रास वाढू शकतो.
त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते. त्वचा मऊ राहते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तसेच पिंपल्स आणि काळेपणा ही कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.