Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात कढीपत्ता आणि कोथिंबीर पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरले जातात. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने या दोघांपैकी नेमके काय अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घ्या.
कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
अपचन किंवा मळमळ होत असल्यास कढीपत्ता खाणे किंवा त्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन 'सी', के आणि भरपूर खनिज घटक असतात. ती शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
कोथिंबीर पचनसंस्था मजबूत करते आणि गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास दूर करते.
यामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.