Manasvi Choudhary
महिलांना बनारसी सिल्क साड्या आवडतात. बनारसी सिल्क साड्या या नक्षीकाम आणि रॉयल टेक्सचरसाठी प्रसिद्ध आहेत.
तुम्हालाही बनारसी सिल्क साड्या खरेदी करायच्या असतील तर लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहूया.
लाल, मोर पंखी, हिरवी किंवा रॉयल ब्लू या डार्क रंगांवर सोन्याची किंवा चांदीची जाड जरी बॉर्डर असलेली ही साडी तुम्ही निवडू शकता.
प्युअर रेशमी धाग्यांपासून तयार केलेली कातन सिल्क साडी अतिशय गुळगुळीत, चमकदार आणि टिकाऊ असते. यावर बारीक बुट्टा किंवा जॅकार्ड पल्लव असतो.
जरीच्या धाग्यांचा वापर करून विणलेली टिश्यू सिल्क साडी अतिशय हलकी आणि ग्लॅमरस दिसते. कॉकटेल पार्टी किंवा रिसेप्शनसाठी हा एक मॉडर्न आणि रिच पर्याय आहे.
आजकाल पेस्टल रंगांची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. यावर पारंपरिक बुट्ट्याऐवजी फुलांच्या डिझाईन्सची नक्षी असलेली बनारसी साडी तरुण मुलींच्या पसंतीस उतरत आहे.
ज्या साड्यांच्या पदरावर आणि बॉर्डरवर उठावदार पैठणी किंवा मुगलकालीन डिझाईन्सचे काम असते, ती ब्रोकेड बनारसी साडी नेसल्यावर अत्यंत राजेशाही लूक देते.