Curry Leaves Storage Tips: कढीपत्ता खराब होऊ नये म्हणून करा 'हे' 7 सोपे उपाय; महिनाभर राहील फ्रेश

Shruti Vilas Kadam

कढीपत्ता पूर्णपणे कोरडा करा

कढीपत्ता धुतल्यानंतर त्यावरील अतिरिक्त पाणी स्वच्छ कापड किंवा किचन टॉवेलने पूर्णपणे पुसून घ्या. पानांवर ओलावा राहिल्यास ती लवकर काळी पडू शकतात.

Curry Leaves Storage Tips | Google

ओलाव्यामुळे कढीपत्ता खराब होतो

कढीपत्ता खराब होण्यामागे पानांमध्ये राहिलेला ओलावा हे प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तो पूर्णपणे कोरडा असणे महत्त्वाचे आहे.

Curry Leaves Storage Tips | Google

हलका गरम करण्याची ट्रिक वापरा

कढीपत्ता एअर फ्रायर, मायक्रोवेव्ह किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये साधारण एक-दोन मिनिटे हलका गरम करता येतो. मात्र पाने जळणार नाहीत याची काळजी घ्या.

Curry Leaves Storage Tips | Google

हवाबंद डब्यात साठवा

हलका गरम केल्यानंतर कढीपत्ता पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास तो अधिक काळ वापरण्यायोग्य राहण्यास मदत होऊ शकते.

Curry Leaves Storage Tips | pinterest

महिनोनमहिने ठेवायचा असेल तर फ्रीझ करा

कढीपत्ता धुऊन आणि कोरडा करून देठापासून पाने वेगळी करा. बर्फाच्या ट्रेमध्ये पाने ठेवून त्यात पाणी भरा आणि फ्रीजरमध्ये ठेवा.

Curry Leaves Storage Tips | Google

कढीपत्त्याचे बर्फाचे तुकडे बनवा

बर्फ तयार झाल्यानंतर हे तुकडे झिप-लॉक पिशवीत ठेवून पुन्हा फ्रीजरमध्ये साठवता येतात. स्वयंपाक करताना गरजेनुसार एक तुकडा वापरता येतो.

Curry Leaves Storage Tips | Google

साठवताना तापमानातील बदल टाळा

कढीपत्ता वारंवार बाहेर काढून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा ताजेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तेवढाच कढीपत्ता बाहेर काढून उर्वरित योग्य पद्धतीने साठवा.

Curry Leaves Storage Tips | yandex

Skin Care: चेहरा दिसेल एकदम हायड्रेटेड आणि ग्लोइंग! फक्त ३ गोष्टी वापरून बनवा हे जादूई टोनर

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा