Shreya Maskar
कुरळ्या केसांसाठी तेल बनवण्यासाठी मोहरीचे तेल, मेथीचे दाणे हे दोन पदार्थ लागतात.
तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करून घ्या.
तेल गरम झाल्यानंतर त्यात मेथीचे दाणे टाका.
गॅस मध्यम आचेवर ठेवून मेथीच्या दाण्यांचा रंग काळा होईपर्यंत परतून घ्या.
त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड करायला १०-१५ मिनिटे ठेवून द्या.
तेल थंड झाल्यावर ते गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
आठवड्यातून १-२ वेळा या तेलाने केसांची मालिश करा.
रात्रभर तेल लावून सकाळी हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या.