Manasvi Choudhary
कुरळ्या केसांची रचना ही इतर केसांपेक्षा वेगळी असते हे केस लवकर कोरडे आणि गुतांगुतीचे होतात.
कुरळ्या केसांची काळजी घेणे नैसर्गिकरित्या त्यांची ठेवण योग्य प्रकारे असणे महत्वाचे आहे.
कुरळ्या केसांसाठी नेहमी ''सल्फेट-फ्री' शाम्पू वापरा. यामुळे केस कोरडे होत नाही.
सल्फेटमुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस जास्त कोरडे होतात यामुळे आठवड्यातून फक्त २ वेळा केस धुवा.
कुरळ्या केसांना ओलाव्याची खूप गरज असते. शाम्पू केल्यानंतर भरपूर प्रमाणात कंडिशनर लावा.
केस धुतल्यानंतर ते टॉवेलने घासून कोरडे करू नका. त्याऐवजी ओल्या केसांमध्ये 'लीव्ह-इन कंडिशनर' किंवा 'हेअर जेल' लावा आणि खालून वरच्या दिशेला हाताने केस दाबा यामुळे कुरळे केस नीट बसतात.
साध्या टॉवेलमुळे केसांमध्ये घर्षण होऊन ते फुगतात. त्याऐवजी मायक्रोफायबर टॉवेल किंवा जुना सुती टी-शर्ट वापरून जास्तीचे पाणी टिपून घ्या.