Shruti Vilas Kadam
बेकिंग सोडा (Baking Soda)
डायरेक्ट केसांवर बेकिंग सोडा लावल्यास केस फ्रिजी आणि स्काल्प कोरडा होऊन खराब होतात.
हीटिंग टूल्स (गरम उपकरणे)
ओल्या केसांवर हेअर स्ट्रेटनर, कर्लर यांसारखी उपकरणे वापरू नका हे केस तुटण्यास कारणीभूत ठरतात.
साबण किंवा क्लीनझर्स
साबण किंवा क्लीनझर वापरल्यास केस चिकट होतात आणि नैसर्गिक तेल नष्ट होते.
हाय सल्फेट असलेले शॅम्पू
सल्फेटयुक्त शॅम्पू कर्ल्सचे नैसर्गिक वॅक्स कमी करतात आणि केसांना नाजूक बनवतात त्यामुळे केस सहज तुटतात.
ब्लो ड्रायरचा तातडीने वापर
ब्लो ड्रायरने केस पटकन सुकवण्याचा प्रयत्न केल्याने केस जमू लागतात, बाउन्स कमी होतात.
चुकीचे हेअपॅक वापरणे
घरगुती पॅक किंवा हेअर मिक्सचर जे खूप रसायनिक घटकांनी बनलेले असतात, ते कर्ली केसांना हानी पोहोचवू शकतात.
गंभीर केमिकल ट्रीटमेंट्स
बळकट पर्म, स्ट्रेटनिंग किंवा परमनेंट कलरिंग सारखी रासायनिक प्रक्रिया कर्ल्सचे स्वरूप, लवचीकता नष्ट करतात.