ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दही आणि योगर्ट हे दुग्धजन्य पदार्थ आहेत. या दोघांचा आहारात समावेश केल्यास अनेक फायदे होतात.
अनेकदा काही जण दही आणि योगर्टला एकच पदार्थ समजतात. दोघांचा रंग सफेद असला तरी दोघांमध्ये खूप अंतर आहे.
हे दोन्ही पदार्थ दुधापासून बनतात. आणि यांची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे.
दहीमध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यासाठी हलक्या गरम दुधाचा वापर केला जातो.
योगर्टमध्ये थर्मोफिलस आणि बल्गेरिकस बॅक्टेरिया असतात. याशिवाय यामध्ये दहीवाले बॅक्टेरिया सुद्धा असतात
दही हे चवीला थोड आंबट असतं तर योगर्ट हे चवीला गोड असतं.
योगर्टला कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. त्यामुळे डाएटमध्ये याचा समावेश केला जातो.
हे दोन्ही शरीरासाठी उत्तम आहेत. परंतु योगर्टमध्ये अधिक प्रमाणात चांगले बॅक्टेरिया असतात.
NEXT: हिवाळ्यात सतत ओठ कोरडे पडतात? फॅालो करा 'या' टिप्स