Cupcake Recipe: लहानमुलांसाठी ओव्हनशिवाय बनवा टेस्टी एगलेस चॉकलेट कपकेक्स; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

१ कप मैदा, ¼ कप कोको पावडर, ½ कप साखर, १ टीस्पून बेकिंग पावडर, ½ टीस्पून बेकिंग सोडा, ½ कप दूध, ¼ कप तेल, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि चिमूटभर मीठ घ्या.

Cupcake Recipe

कोरडे साहित्य एकत्र करा

एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून एकत्र मिसळा. त्यामुळे कपकेक्स अधिक मऊ होतात.

cupcake | yandex

ओले साहित्य मिसळा

दुसऱ्या भांड्यात दूध, साखर, तेल आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित फेटा.

cupcake | yandex

बॅटर तयार करा

ओले मिश्रण हळूहळू कोरड्या मिश्रणात घाला. गुठळ्या न राहता हलक्या हाताने मिसळा. बॅटर जास्त फेटू नका.

cupcake | yandex

कपकेक मोल्डमध्ये भरा

पेपर लाइनर असलेल्या कपकेक ट्रेमध्ये प्रत्येक कप ⅔ भागापर्यंत बॅटर भरा, जेणेकरून बेक होताना कपकेक्स व्यवस्थित फुगतील.

cupcake | yandex

कुकरमध्ये बेक करा

कुकरमध्ये दाकण उलट ठेवून कमी आचेवर १२ ते १५ मिनिटे (किंवा इंडक्शनवर १८-२० मिनिटांपर्यंत) बेक करा. मध्यभागी टूथपिक किंवा सुरी घालून तपासा; ती स्वच्छ बाहेर आली, तर बेकिंग पूर्ण झाले आहे असे समजावे

cupcake | yandex

थंड करून सजवा

कपकेक्स पूर्णपणे थंड झाल्यावर चॉकलेट गनाश, व्हीप्ड क्रीम किंवा चॉकलेट चिप्सने सजवून सर्व्ह करा.

cupcake | yandex

Health Care: रात्रीच्या जेवणानंतर फक्त १५ मिनिटे करा हा उपाय; वजन कमी होण्यासोबत मिळतील हे ७ फायदे

Walking After Dinner Benefits
येथे क्लिक करा