Shruti Vilas Kadam
जेवणानंतर 10 ते १५ मिनिटं चालल्याने अन्नाचे पचन सुरळीत होण्यास मदत होते. तसेच गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी होऊ शकते.
जेवणानंतर चालल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. नियमित ही सवय लावल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होऊ शकतो.
जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेषतः मधुमेहाचा धोका असलेल्यांसाठी ही सवय फायदेशीर ठरू शकते.
रात्री थोडे चालल्याने शरीर रिलॅक्स होते आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे शांत आणि चांगली झोप लागू शकते.
नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळू शकते.
जेवणानंतर थोडे चालल्याने आतड्यांची हालचाल सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट साफ न होण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी काही मिनिटे चालल्याने शरीर अधिक सक्रिय राहते आणि सकाळीही ताजेतवाने वाटू शकते.