Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीचं पाणी खूप उपयुक्त ठरतं. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होतं. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.
काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असतं, त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. सकाळी काकडीचं पाणी पिण्यामुळे दिवसभर डिहायड्रेशन टाळता येतं. उन्हाळ्यात हे नैसर्गिक हायड्रेशनसाठी उत्तम पर्याय आहे.
काकडी थंड असून त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. सकाळी हे पाणी घेतल्यास शरीर शांत आणि थंड राहते. त्यामुळे उष्माघात किंवा जास्त उकाड्यामुळे होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळू शकतं.
काकडीचं पाणी कमी कॅलरीयुक्त असतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नियमित सेवन केल्यास हळूहळू वजन कमी होण्यास फायदा होऊ शकतो.
काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे त्वचेचं आरोग्य सुधारतात. सकाळी काकडीचं पाणी प्यायल्याने त्वचा ताजीतवानी आणि चमकदार दिसते. यामुळे पिंपल्स आणि त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
काकडीचं पाणी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करतं. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं. त्यामुळे शरीर स्वच्छ राहून ऊर्जा वाढते.