Manasvi Choudhary
चेहऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी महिला अनेक घरगुती उपाय करतात. ग्लोईंग स्किनसाठी काकडीचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे.
बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनापेक्षा घरगुती काकडीच्या फेसपॅकने तुम्ही चेहऱ्यावर ग्लो वाढू शकता. काकडी आरोग्यासाठी गुणकारी आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
एका वाटीत काकडीचा रस आणि एलोवेरा जेल चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर नीट लावा. १५ ते २० मिनिटे सुकल्यावर स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
काकडीच्या रसामध्ये लिंबू रस मिक्स करून ते तुम्ही चेहऱ्यावर लावा. १० मिनिटे ठेवून चेहरा धुवा.
काकडीत पाण्याचे प्रमाणत अधिक असते ज्यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहतो त्वचा कोरडी होत नाही.
काकडीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरची जळजळ कमी होते.
काकडीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूमे या समस्या कमी होतात. चेहरा स्वच्छ होते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.