Manasvi Choudhary
काकडी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीरा हायड्रेट राहते.
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे पाणी कमी प्यायले जाते अशावेळी थंडगार काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते
काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. थंडगार काकडी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
काकडीत सिलिका आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. थंड काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होते त्वचेला नैसर्गिक चमक येते
काकडीमध्ये असलेले विरघळणारे फायबर पचनक्रिया सुरळीत करते. थंडगार काकडी खाल्ल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो.
काकडी खाल्ल्याने तोंडातील लाळेचे प्रमाण वाढते, जे दुर्गंधी पसरवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत करते तोंडाची दुर्गंधी दूर होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.