Vishal Gangurde
तुम्हाला सायंकाळी चहासोबत काही चवदार आणि क्रंची खाण्याचा विचार येत असेल.
तुम्ही ब्रेडपासून क्रंची पिझ्झा-बर्गर बनवू शकता. तुम्हाला बनवण्यासाठी अवघे दोन मिनिटे लागतील.
तुम्ही आधी ब्रेडचे चार स्लाइड घ्या. त्यावर बटर लावा.
बटर लावल्यानंतर ब्रेडवर मोझरेला चीज पसरवा.
ब्रेडवर मोझरेला चीज घालण्यापूर्वी ते १–२ मोठे चमचे गरम दुधात मॅश करून घ्यायला विसरू नका. मॅश केल्यानंतर चीज पसरवण्यास विसरू नका.
ब्रेडवर २-३ चिरलेल्या मिरच्या, चिली फ्लेक्स ( अर्धा चमचा), ओरेगानो ( अर्धा चमचा) आणि थोडे मीठ घाला.
गॅस सुरु केल्यानंतर त्यावर तवा ठेवा. या तवा थोडा गरम झाल्यावर त्यावर बटर टाका. त्यानंतर या तव्यावर ब्रेडचे स्लाइस ठेवा. त्यानंतर मंद आचेवर ब्रेड गरम करा.
२ मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या. ब्रेडची एक स्लाइस एका प्लेटवर ठेवा. या ब्रेडच्या स्लाइसवर चिली चीज टाकल्यानंतर रेसिपी तयार होईल.