DCS MH App: आता मोबाईलवरूनच करता येणार पीक नोंदणी, ‘या’ ॲपचा वापर करा

Surabhi Jayashree Jagdish

‘डीसीएस एमएच’ ॲप

पीक पाहणीच्या प्रक्रियेला आता डिजिटल स्वरूप देण्यात आलं असून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी स्वतः करता येणार आहे. केंद्र शासनाच्या ‘डीसीएस एमएच’ मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या मोबाईलवरून शेतातील पिकांची माहिती नोंदवू शकतील. त्यामुळे पीक नोंदणीसाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

crop registration | saam tv

Farmer ID वापरून सर्व शेतजमिनींची नोंदणी

पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला Farmer ID प्रविष्ट करावा लागेल. या Farmer ID शी जोडलेल्या सर्व शेतजमिनी ॲपमध्ये पाहता येतील. त्यानंतर संबंधित शेतजमिनीमध्ये घेतलेल्या पिकांची नोंद करता येणार आहे.

crop survey Maharashtra | saam tv

Farmer ID वापरून सर्व शेतजमिनींची नोंदणी

पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला Farmer ID प्रविष्ट करावा लागेल. या Farmer ID शी जोडलेल्या सर्व शेतजमिनी ॲपमध्ये पाहता येतील. त्यानंतर संबंधित शेतजमिनीमध्ये घेतलेल्या पिकांची नोंद करता येणार आहे.

Pik Pahani online | saam tv

पीक नोंदणीची सुविधा सुरू

यापूर्वी पीक नोंदणीची प्रक्रिया सहाय्यक स्तरावरून केली जात होती. आता ही प्रक्रिया शेतकऱ्यांनाही स्वतःच्या स्तरावरून करता येणार आहे. त्यामुळे आपल्या शेतातील पिकांची माहिती शेतकरी थेट ॲपमध्ये नोंदवू शकतील.

farmer ID | saam tv

घरबसल्या करता येणार पीक पाहणी

पीक पाहणीची प्रक्रिया जलद आणि सुलभ व्हावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या पीक नोंदणी करता येणार आहे.

crop registration app | saam tv

अचूक माहिती देणं आवश्यक

पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष लागवड केलेल्या पिकांचीच माहिती नोंदवावी. पिकाचे नाव आणि संबंधित माहिती अचूक पद्धतीने भरावी. आपल्या शेतातील प्रत्यक्ष पिकांशी जुळणारी पूर्ण माहिती नोंदवणं महत्त्वाचं आहे.

Maharashtra farmers | saam tv

पीक नोंदणीतील माहिती सरकारला मिळणार

या प्रक्रियेतून राज्यातील विविध पिकांशी संबंधित माहिती संकलित होणार आहे. त्यामध्ये विविध पिकांचं क्षेत्र आणि लागवडीची स्थिती याबाबतची माहिती उपलब्ध होईल. या नोंदीच्या आधारे राज्यातील पिकांची आकडेवारी शासनाला अधिक अचूकपणे मिळू शकणार आहे.

digital crop survey | saam tv

अशी करा मोबाईलवरून पीक नोंदणी

सर्वप्रथम मोबाईलमध्ये ‘डीसीएस एमएच’ ॲप डाऊनलोड करून ते उघडावं. त्यानंतर आपला शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID प्रविष्ट करून त्याच्याशी संलग्न शेतजमिनी तपासाव्यात. शेवटी शेतात प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची अचूक माहिती ॲपमध्ये नोंदवावी.

digital crop registration | saam tv

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

येथे क्लिक करा