Manasvi Choudhary
नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ खायला अनेकांना आवडते. मसाला डोसा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. मात्र तुम्हालाही जर नेहमीचा मसाला डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नवीन रेसिपी ट्राय करा.
शरीराला भरपूर ऊर्जा आणि पोषण देणारा शेवग्याच्या शेंगांचा कुरकुरीत डोसा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
शेवग्याच्या शेंगांचा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ, उडीद डाळ, शेवग्याच्या शेंगा, लसूण, हिरवी मिरची, जिरे, कांदा, कोथिंबीर, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वातआधी ६ ते ७ तास तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घाला. त्यानंतर भिजवलेली तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर हे दोन्ही मिश्रण एकत्र करून ४ ते ५ तास आंबवण्यासाठी ठेवा.
गॅसवर कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा बारीक करून उकडून घ्या. शेंगा उकडून झाल्या की मिश्रण थंड करा. एका भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा गर चमच्याने वेगळा करा.
मिक्सरच्या भांड्यात शेवग्याचा गर, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि जिरे घालून बारीक वाटून पेस्ट वाटून घ्या.
शेवग्याच्या शेंगांचे मिश्रण डोशाच्या पिठामध्ये एकत्र करा. त्यात चिमूटभर हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून पीठ व्यवस्थित ढवळून घ्या
गॅसवर गरम तव्यावर थोडेसे तेल घाला नंतर डोशाचे मिश्रण पातळ पसरवून घ्या. डोशावर थोडे तेल किंवा बटर सोडा.
डोसा दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून घ्या. अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगाचा डोसा सर्व्हसाठी तयार आहे.