Siddhi Hande
लहान मुलांना नेहमी काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतं. यासाठी तुम्ही पंजाबी समोसा बनवू शकतात.
मैदा, रवा, ओवा, तूप, मीठ, उकडलेले बटाटे, जिरे, बडीशेप, धना पावडर, मिरची, आलस कढीपत्ता, तेल, जिरं, हिंग, लाल तिखट, धना पावडर,हळद पावडर, पंजाबी गरम मसाला, आमचूर पावडर
सर्वात आधी तुम्हाला पीठ मळून घ्यायचे आहे. यासाठी सर्वात आधी मैदा चाळून घ्या. त्यात मीठ टाका. यानंतर त्यात साजूप तूप टाकून मिक्स करा.
यानंतर हे मीठ घेतल्यावर तुमच्या हाताची मूठ बांधेल एवढे मोहन टाका. यानंतर हे पीठ झाकून ठेवा.
यानंतर सारण तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे छान मॅश करुन घ्या. यानंतर धने आणि बडीशेप भाजून ती बारीक करा.यानंतर त्यात हिरव्या मिरच्या बारीक कापून टाका.
कढईत तुम्ही तेल टाकून त्यात जिरं, कढीपत्ता, जिरं, हिंग आणि सर्व मसाले टाकून मिक्स करा. यात आवश्यकतेनुसार मीठ टाका.
यानंतर यात बटाटा मिक्स करुन छान हलवून घ्या. यानंतर हे सारण काढून ठेवा. यानंतर त्या भाजीत आमचूर पावडर,जिरे, बडीशेपची भरड टाका.
यानंतर आता मेद्याच्या पीठाचे गोळे लाटून घ्या. यानंतर ते मध्यभागी कापून घ्या.
यानंतर यामध्ये सारण भरा आणि त्रिकोणी आकारात डुमडून घ्या.
यानंतर तेल तापत ठेवा. तेल छान कडकडीत तापल्यावर त्यात समोसा तळून घ्या.