Bharat Jadhav
लहान मुलं असो की वुद्ध व्यक्ती प्रत्येकाला नाश्तासाठी चमचमीत खायाला आवडतं.
दररोज नवनवीन काय नाश्ता करावं हे सुचित नाही, हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडणारा प्रश्न. नाश्तातर बनवायचं असतं. परंतु काय करावं हे सुचत नाही. त्याच्यासाठी खास पदार्थ आम्ही घेऊन आलोय.
वेळ कमी असेल आणि काहीतरी चमचमीत खायचे असेल तर Potato Bites उत्तम पर्याय आहे. पोटॅटो बाइट्स तुम्ही चहा आणि कॉफीसोबत खाऊ शकतात
बटाटे उकडून ते मॅश करून त्यात मसाले टाकून ते बनवू शकतात.
बटाटा – ३-४ मध्यम आकाराचे घ्या. ब्रेड – २ स्लाईस,
तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार. बाईट्स तळण्यासाठी तेल.
हिरवी मिरची – २-३ बारीक चिरलेली, कोथिंबीर – २ टेबलस्पून बारीक चिरलेली, लाल तिखट – १ टीस्पून, चाट मसाला – १ टीस्पून, गरम मसाला – अर्धा चमचा.
बटाटे उकडून त्याची साल काढून बारीक मॅश करा. त्यानंतर ब्रेड पाण्यात मऊ होईपर्यंत भिजवा त्यानंतर ते मॅश केलेल्या बटाट्यात मिसळा.
मॅश केलेले बटाटे आणि ब्रेडमध्ये लाल तिखट, हिरवी मिरची, गरम मसाला, चाट मसाला आणि तांदळाचे पीठ टाका.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि हलक्या हाताने ते मिश्रण ढवळून घ्या. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून तेल लावलेल्या ताटावर पसरवून सुरीने तुकडे करून घ्या.
गरम तेलात दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
येथे क्लिक करा