Bharat Jadhav
जावई आणि सासऱ्याचे नाते नेहमीच वडील आणि मुलासारखे मानले जाते.
वडिलांच्या संपत्तीत मुलाला जसा वाटा सासऱ्याच्या संपत्तीतून मिळतो का? जावयाला वाटा मिळू शकतो का?
भारतीय वारसा कायद्यानुसार जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीत थेट कोणताही वाटा नसतो.
भारतीय वारसा कायद्यात वैध वारसदारांना क्लास-1 आणि क्लास -2 अशा यादीत विभागलंय.
क्लास -1 मध्ये व्यक्तीच्या जवळचे लोक असतात.
पत्नी, मुलगा, मुलगी आदी. तर क्लास – 2 मध्ये दूरचे नातेवाईक असतात.
जर पत्नी तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार असेल. तिला संपत्ती मिळाली तर पत्नीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रुपाने पतीचा त्यावर अधिकार मिळत असतो.
जर सासऱ्याने आपले इच्छापत्र विशेष रुपाने जावयाच्या नावाने लिहिले असेल तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा कायदेशीर अधिकारी जावई होऊ शकतो.
कोणताही व्यक्ती त्याची मुलगी आणि जावयाला गिफ्ट म्हणून प्रॉपर्टी देऊ शकतो. त्या प्रॉपर्टीला ‘गिफ्ट डीड’ म्हणून रजिस्टर करणे गरजेचं असतं.