Siddhi Hande
भजी सर्वांनाच खूप आवडतात. घरात नेहमी बटाटा भजी, कांदा भजी बनतात.
तुम्ही भजीमध्ये काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करु शकतात. तुम्ही मूग मटार पकोडे बनवू शकतात.
मटार, मूग डाळ, बेसन, तांदळाचे पीठ,हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट, जिरे पावडर, कांदा, कोथिंबीर, मीठ
सर्वात आधी तुम्हाला मूग भिजवत ठेवायचे आहे. त्यानंतर मूग भिजल्यानंतर ते मिक्सरला वाटून घ्या. यामध्ये मटारदेखील वाटून घ्या.
यानंतर एका भांड्यात हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट काढा.
त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, जिरे पावडर आणि मीठ टाकून एकजीव करा. त्यात कोथिंबीर टाका.
यानंतर तुम्ही हे मिश्रण छान एकजीव करुन घ्या.
यानंतर एका बाजूला कढईत तेल गरम करा. त्यात या पीठाचे गोळे सोडा.
छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. हे पकोडे तुम्ही सॉस किंवा पुदीन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात.