Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला तुम्हालाही काही हलकं- फुलकं खायचं असेल तर तुम्ही हेल्दी कुरकुरीत मटकी ही रेसिपी ट्राय करू शकता.
कुरकुरीत मटकी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.गवा
मोड आलेली मटकी, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे- मोहरी, हळद, मसाला, गरम मसाला, कोथिंबीर, तेल आणि मीठ हे साहित्य घ्याय
सर्वप्रथम मोड आलेली मटकी स्वच्छ धुऊन पाणी उपसून बाजूला ठेवा.
एका कढईत २ मोठे चमचे तेल चांगले गरम करा. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून तडतडू द्या.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
त्यानंतर कढईत हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून मिक्स करा.
आता यात मोड आलेली मटकी घालून सर्व मसाला चांगल्या प्रकारे एकत्र करा. मटकीला छान कुरकुरीत टेक्सचर देण्यासाठी ती मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे सतत परतून घ्या.
शेवटी चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान ढवळून घ्या.