Shreya Maskar
कुरकुरीत मठरी बनवण्यासाठी मैदा, तेल, कलौंजी बिया, ओवा, मेथी दाणे, मीठ, मसाले, पाणी, बेकिंग सोडा आणि कसुरी मेथी इत्यादी साहित्य लागते.
मठरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, बेकिंग सोडा आणि तेल एकत्र करून २५ मिनिटे ठेवून द्या.
या पिठात कसुरी मेथी, कलौंजी बिया, ओवा, मीठ आणि हलके मसाले घालून मिक्स करा.
आता यात पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या.
पिठाचा गोळा घेऊन गोलाकार मठरी बनवा.
काट्याच्या चमच्याने मठरीला भोक पाडून घ्या, जेणेकरून मठरी कुरकुरीत होईल.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मठरी गोल्डन तळून घ्या.
खुसखुशीत मठरी हवा बंद डब्यात स्टोर करून ठेवा.