Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्यासाठी तुम्हालाही हलके फुलके काही खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
आज आम्ही तुम्हाला मसाला शेंगदाणे घरी कसे बनवायचे? ही सोपी रेसिपी सांगणार आहोत.
मसाले शेंगदाणा फ्राय रेसिपी बनवण्यासाठी शेंगदाणे, तेल किंवा तूप, हळद, मसाला, मीठ, कढीपत्ता हे साहित्य एकत्र घ्या.
मसाले शेंगदाणे बनवण्यासाठी सर्वातआधी एका कढईत किंवा पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करा. त्यात कच्चे शेंगदाणे भाजून घ्या
गॅस मध्यम ठेवून शेंगदाणे सतत हलवत चांगले खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या
नंतर गॅस स्लो करा आणि त्यात हळद, लाल तिखट, मसाला आणि चवीनुसार मीठ टाका.
मिश्रणात कढीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकू शकता, ज्यामुळे चव आणखी वाढते.
शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे कुरकुरीत शेंगदाणे तुम्ही सर्व्ह करू शकता.