Shreya Maskar
दिवाळीत लहान मुलांसाठी खास खारी शंकरपाळी बनवा.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा, जिरे, ओवा, काळी मिरी पूड, तिखट, हळद , मीठ, तूप इत्यादी साहित्य लागते.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, ओवा, जिरे, काळी मिरी पूड, तिखट, हळद, मीठ आणि तूप घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
पीठ जास्त पातळ मळू नये. यामुळे ते चिकटते.
तयार झालेले पीठ एका ओल्या कपड्यात घालून 15 ते20 मिनिटे ठेवा.
पिठाची गोल पोळी लाटून त्याच्या शंकरपाळ्या पाडून घ्या.
आता गरम तेल करून त्यात शंकरपाळ्या गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
शंकरपाळी जास्त वेळ टिकण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करा.