Shreya Maskar
खाकरा चाट बनवण्यासाठी कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, शेव, चाट मसाला, चीज, चिली फ्लेक्स,हिरवी चटणी, टोमॅटो सॉस इत्यादी साहित्य लागते.
खाकरा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम खाकऱ्यावर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस छान पसरवून घ्या.
आता टोमॅटो, कोबी आणि शिमला मिरची बारीक चिरून खाकऱ्यावर पसरवा.
त्यावर आता चवीनुसार चाट मसाला आणि चिली फ्लेक्स टाका.
चाटची चव अजून वाढवण्यासाठी त्यात मसाला शेंगदाणे आणि बारीक शेव घाला.
शेवटी खाकऱ्यावर किसलेले चीज आणि चिरलेली बारीक कोथिंबीर टाका.
अजून चाटची चव वाढवण्यासाठी त्यावर दही घाला.
अवघ्या १० मिनिटांत संध्याकाळचा चटपटीत खाकरा चाट तयार झाला.