ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुगडाळ कचोरी हे एक प्रसिध्द भारतीय स्नॅक आहे. हि कचोरी मसालेदार डाळने भरलेली असते.
मुग डाळ, मैदा, हळद, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, ओवा आणि तेल
डाळेला स्वच्छ धुवून भिजवा आणि नंतर मसाल्यांसोबत वाटून घ्या.तुम्ही नंतर त्या हलक्या भाजून देखील घेऊ शकता.
मैदा, मीठ, ओवा आणि तेल पिठात मिक्स करुन नरम पीठ मळून घ्या.
पिठाचे छोटे गोळे बनवा त्यात डाळेचे मिश्रण भरा आणि ते सील करुन घ्या.
कचोरीला मध्य आचेवर गरम तेलामध्ये सोनेरी रंग येई पर्यंत तळा.
गरमागरम कचोरी हिरव्या चटणी किंवा बटाट्याच्या करीसोबत सर्व्ह करा आणि आस्वाद घ्या.