ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्रीच्या किंवा दुपारच्या उरलेल्या चपातींपासून तयार केला जाणारा कुरकुरीत आणि चवदार चिवडा. हा चिवडा झटपट बनला जाणारा आहे. चपाती वाया न घालवता त्यापासून बनवला जाणारा हा चिवडा एकदा नक्कीच ट्राय करा. जाणून घ्या रेसिपी.
उरलेल्या चपात्या, मोहरी, जिरे, तेल, कढीपत्ता, हिरवी मिरच्या, चवीनुसार मीठ, हळद आणि हवे असल्यास शेंगदाणे इ. साहित्य लागते.
चपाती तव्यावर गरम करुन घ्या. थंड झाल्यावर चपातीचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. तुम्हाला अधिक बारिक तुकडे हवे असतील तर चपाती मिस्करमध्ये बारिक करुन घ्या. सुक्या चपाती असतील तर चिवडा अधिक कुरकुरीत होतो.
कढईत थोडं तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर चपातीचे केलेले छोटे तुकडे मंद आचेवर परतून घ्या. सगळे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता.
त्याच कढईत तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाका. शेंगदाणे घालून छान तळून घ्या.
गॅस बंद करून हळद आणि मीठ घाला.गॅस बंद केल्यामुळे मसाले जळत नाहीत आणि चव छान लागते.
कुरकुरीत चपातीचे तुकडे फोडणीत घालून हलक्या हाताने किंवा चमच्याने मिक्स करा.सगळ्या तुकड्यांना मसाला नीट लागेल असे मिक्स करा.
जर तुम्हाला हवे असल्यास चिवड्यावर थोडा लिंबाचा रस किंवा साखर घालू शकता.वरून कोथिंबीर टाकल्यास चिवडा अधिक चविष्ट लागतो.
गरमागरम चपाती चिवडा तयार आहे. चहा सोबत, टिफिनसाठी किंवा सकाळ संध्याकाळच्या स्नॅकसाठी हा चिवडा परफेक्ट आहे.