Manasvi Choudhary
संध्याकाळी चहासोबत चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही क्रिस्पी कॉर्न नक्की बनवू शकता.
क्रिस्पी कॉर्न घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही झटपट बनवू शकता.
क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी मक्याचे दाणे, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ, मैदा, लाल मसाला, काळी मिरी पावडर, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात थोडे मीठ टाका आणि कॉर्न मिक्स करा. कॉर्न शिजले की गॅस बंद करा आणि गाळणीने गाळून घाला.
उकडलेले कॉर्न एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ, मैदा, लाल मसाला, मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाका.
संपूर्ण मिश्रण एकजीव करा म्हणजे पिठाचे कोटिंग व्यवस्थित लागेल.
गॅसवर कढईत गरम तेलात कॉर्न सोडा. कॉर्न छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.