Manasvi Choudhary
कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारले, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, मसाला, हळद, धना, जिरे हे साहित्य घ्या.
कारल्याची भजी बनवण्यासाठी सर्वातआधी कारले गोलाकार बारीक कापून घ्या.
नंतर एका भांड्यामध्ये बेसन, रवा, कॉर्न फ्लोअर, मसाला, चाट मसाला, हिंग, लसूण,मिरची पेस्ट, आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मिक्स करा.
नंतर मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण पातळ झाले तर त्यात चण्याचे पीठ मिक्स करा.
नंतर कापलेली गोलाकार कारली तयार केलेल्या मिश्रणात चांगली मिक्स करून घ्या
गॅसवर गरम तेलामध्ये एक-एक करून कारल्याचे काप सोडा. गॅस मध्यम आचेवर ठेवून भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.