Siddhi Hande
कारलं खायला कोणालाच आवडतं नाही. कडू कारलं म्हणून लहान मुले नाक मुरडतात.
कारलं हे पौष्टिक असते त्यामुळे ते लहान मुलांनी खाल्लं पाहिजे.
तुम्ही कारल्याचे कुरकुरीत काप बनवू शकतात. हे काप आजिबात कडू लागत नाही.
सर्वात आधी तुम्हाला कारली धुवून घ्यायची आहेत त्याचे पातळ काप करा.
यानंतर कारल्याचे कापात थोडं पाणी टाका. त्यात थोडं मीठ टाका. जेणेकरुन त्यातील कडवटपणा निघून जाईल.
यानंतर कारल्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका.
यानंतर एका भांड्यात कारल्याचे काप घ्या.त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाका. त्यात मीठ टाकून मिक्स करा.
यानंतर तुम्हाला तांदळाचे पीठ, रवा आणि लाल तिखट एकत्र करा.यानंतर कारल्याचे काप या रव्यात छान घोळवून घ्या.
एका बाजूला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर तेल टाका.
यानंतर हे कारल्याचे काप त्यावर ठेवा. छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे काप भाजून घ्या.