Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

कारले

कारले म्हटलं अनेकजण नाक मुरडतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना कारले भाजी आवडत नाही.

Bitter Gourd

आरोग्यासाठी गुणकारी कारले

मात्र कारला हा आरोग्यासाठी गुणकारी आहे. कडू कारल्याची विविध प्रकार बनवल्यास तुम्हाला आवडेल.

Crispy Bitter Gourd Pakoda

कारल्याची कुरकुरीत भजी

यासाठी आज आम्ही तुम्हाला कारल्याची कुरकुरीत भजी कशी बनवायची? ही रेसिपी सांगणार आहोत.

Crispy Bitter Gourd Pakoda

कारले स्वच्छ धुवून घ्या

कारल्याची भजी बनवण्यासाठी सर्वातआधी कारले स्वच्छ धुवून घ्या. कारले सुती कापडाने पुसून घेतल्यानंतर त्याचे बारीक गोलाकार काप करा. एका भांड्यात कारल्याचे काप आणि मीठ एकत्र मिक्स करून बाजूला ठेवा.

Bitter gourd | yandex

मिश्रण एकजीव करा

दुसऱ्या एका भांड्यात बेसन, कॉर्नफ्लोअर, मैदा, मसाला, मीठ, हळद, तीळ आणि मीठ लावलेले काप एकत्र मिक्स करून ठेवा. कारल्याचे काप मिश्रणात व्यवस्थित मिक्स करा म्हणजे त्यांना मसाला नीट लागेल.

Crispy Bitter Gourd Pakoda

कारले फ्राय करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये कारल्याचे काप एक एक करून सोडा. कारल्याचे काप दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्या.

Crispy Bitter Gourd Pakoda

कारल्याचे कुरकुरीत काप तयार

कारल्याचे काप क्रिस्पी झाल्यानंतर सर्व्हसाठी रेडी करा. अशाप्रकारे घरच्या घरी नाश्त्याला कुरकुरीत कारल्याचे काप तयार होतील.

Crispy Bitter Gourd Pakoda

next: Mangalsutra Designs: 4 ते 5 ग्रॅममध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, लूक दिसेल सुंदर आणि राजेशाही

येथे क्लिक करा...