Creamy Cold Coffee Recipe: घरच्या घरी बनवा मलाईदार कोल्ड कॉफी; फक्त १० मिनिटांत तयार होईल कॅफेसारखी चव

Shruti Vilas Kadam

साहित्य

२ कप थंड दूध, २ टीस्पून इंस्टंट कॉफी पावडर, २ ते ३ टीस्पून साखर, ५ ते ६ बर्फाचे तुकडे, २ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम (ऐच्छिक), १ टीस्पून चॉकलेट सिरप, थोडी व्हीप्ड क्रीम किंवा चॉकलेट शेव्हिंग्स सजावटीसाठी

Cold Coffee Recipe | pinterest

कॉफीचे मिश्रण तयार करा

मिक्सरच्या जारमध्ये कॉफी पावडर, साखर आणि २ टेबलस्पून कोमट पाणी घालून १ मिनिट फेसाळ होईपर्यंत ब्लेंड करा.

Ice cream cold coffee Recipe | Saam Tv

दूध आणि बर्फ घाला

आता त्यात थंड दूध, बर्फाचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून पुन्हा ३० ते ४० सेकंद ब्लेंड करा.

Cold Coffee Recipe

मलाईदार टेक्स्चर मिळवा

कॉफी अधिक क्रीमी हवी असल्यास थोडी फ्रेश क्रीम किंवा अतिरिक्त आईस्क्रीम घाला. यामुळे कॅफेसारखी स्मूथ चव मिळते.

Cold Coffee Recipe

ग्लास सजवा

सर्व्हिंग ग्लासच्या आतील बाजूला चॉकलेट सिरप लावून घ्या. त्यामुळे कोल्ड कॉफी दिसायलाही आकर्षक वाटते.

chocolate cold coffee

थंडगार सर्व्ह करा

तयार कोल्ड कॉफी ग्लासमध्ये ओता. वरून व्हीप्ड क्रीम, चॉकलेट शेव्हिंग्स किंवा कॉफी पावडर शिंपडून सजवा.

cold coffee at home

चव वाढवण्यासाठी टिप

कॉफीला वेगळी चव हवी असल्यास त्यात चिमूटभर दालचिनी पावडर, कोको पावडर किंवा काही थेंब व्हॅनिला इसेन्स घालू शकता. यामुळे चव अधिक रिच आणि सुगंधी होते.

Ice cream cold coffee Recipe | Saam Tv

Women Weight Loss: योगा किंवा एक्सरसाईज न करताही कमी करा वजन; महिलांनी फक्त फॉलो करा हे सोपे डाएट टिप्स

Women Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा