Best oil for deep frying: तळलेला समोसा किंवा भजी खायचीये? हे 4 ऑईल ठरतील बेस्ट तुमचं लिव्हरही होणार नाही खराब

Surabhi Jayashree Jagdish

तळीसाठी वापराचं तेल

गरमागरम समोसे, भजी किंवा इतर फ्राइड पदार्थ अनेकांच्या आवडीचे असतात. मात्र पदार्थ तळण्यासाठी वापरलं जाणारं तेल योग्य असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. डीप फ्रायिंगदरम्यान तेल खूप तापते आणि चुकीच्या तेलाची निवड केल्यास हानिकारक घटक तयार होऊ शकतात. त्यामुळे डीप फ्रायिंगसाठी योग्य तेल निवडणं महत्त्वाचं ठरतं.

high smoke point oils | SAAM TV

रिफाइंड ऑलिव्ह ऑइल

डीप फ्रायिंगसाठी दुसरा पर्याय म्हणजे रिफाइंड ऑलिव्ह ऑइल. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. या तेलाचा स्मोक पॉइंट सुमारे 465°F म्हणजेच जवळपास 240°C इतका आहे.

deep frying oil | SAAM TV

तूप

तेलाऐवजी तुपाचाही डीप फ्रायिंगसाठी वापर करता येतो. तूप म्हणजेच क्लॅरिफाइड बटर असून त्याचा स्मोक पॉइंट सुमारे 450°F म्हणजेच जवळपास 232°C आहे. त्यामुळे तुपाचा वापर करूनही पदार्थ डीप फ्राय करता येतात.

ghee for deep frying | SAAM TV

रिफाइंड खोबरेल तेल

डीप फ्रायिंगसाठी रिफाइंड खोबरेल तेल हा एक पर्याय मानला जातो. या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. याचा स्मोक पॉइंट सुमारे 400°F म्हणजेच जवळपास 204°C इतका असतो.

smoke point of cooking oils | SAAM TV

एवोकाडो ऑइल

डीप फ्रायिंगसाठी चौथा पर्याय एवोकाडो ऑइलचा आहे. यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि त्याचा स्मोक पॉइंट सुमारे 520°F म्हणजेच जवळपास 271°C इतका आहे. या चार पर्यायांमध्ये एवोकाडो ऑइलचा स्मोक पॉइंट सर्वाधिक असल्याने ते डीप फ्रायिंगसाठी चांगले मानले जाते.

high heat cooking oil | SAAM TV

तेल निवडताना स्मोक पॉइंट महत्त्वाचा

डीप फ्रायिंगमध्ये तेल मोठ्या प्रमाणात गरम केलं जातं. त्यामुळे त्याचा स्मोक पॉइंट लक्षात घेणं आवश्यक ठरतं. ज्या तापमानावर तेल धूर सोडू लागतं त्याला स्मोक पॉइंट म्हटलं जातं. त्यामुळे डीप फ्रायिंगसाठी तुलनेने जास्त स्मोक पॉइंट असलेल्या तेलांचा विचार केला जातो.

best frying oil | SAAM TV

फ्राइड फूड

डीप फ्रायिंग ही रोजच्या आहारासाठी आरोग्यदायी स्वयंपाकाची पद्धत मानली जात नाही, त्यामुळे तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरतं. मात्र कधीतरी समोसा किंवा अन्य फ्राइड स्नॅक्स खायचे असतील, तर योग्य तेलाची निवड करणं फायदेशीर आहे.

refined olive oil smoke point | SAAM TV

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

deep fried food | SAAM TV

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा