ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाने पेपर संपले असून त्यांना सुट्ट्या आहेत.
दहावी -बारावीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही काही कोर्स करु शकतात. ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होईल.
दहावी-बारावीनंतर तुम्ही एम एस सीआयटीचा (MS CIT) कोर्स करु शकता.
दहावीनंतर जर तुम्हाला ग्राफिक्सची आवड असेल तर तुम्ही ग्राफिक्स डिझाइनिंगचा कोर्स करु शकता.
दहावी-बारावीच्या सुट्टीत तुम्ही अॅनिमेशनचा कोर्स करु शकता. ज्यात तुम्ही अॅनिमेशन शिकू शकता.
तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा ऑनलाइन कोर्स करु शकता. त्यात तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाईल.
तुम्ही इंग्लिश स्पिकिंगचा सर्टिफिकेट कोर्स करु शकता. जेणेकरुन तुमचे इंग्लिश चांगले होईल.
तुम्हाला जर मेकअपची आवड असेल तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट किंवा बेसिक मेकअपचा कोर्स करु शकता.