Cotton One Piece Designs: पावसाळ्यात स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ युनिक कॉटन वन पीस डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

फ्लोरल प्रिंट कॉटन वन पीस

फुलांच्या प्रिंटचा कॉटन वन पीस नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. हलके रंग आणि आकर्षक प्रिंट्समुळे हा ड्रेस कॅज्युअल आउटिंग, पिकनिक किंवा डे-आउटसाठी उत्तम पर्याय ठरतो.

Cotton One Piece Designs | Pintrest

ए-लाइन कॉटन ड्रेस

ए-लाइन कटचा वन पीस जवळपास प्रत्येक बॉडी टाइपवर खुलून दिसतो. साधा पण एलिगंट लूक देणारा हा ड्रेस ऑफिस, कॉलेज किंवा दैनंदिन वापरासाठी योग्य आहे.

Monsoon special One Piece | Pintrest

टियरड (Layered) कॉटन वन पीस

टियरड डिझाइन असलेले कॉटन ड्रेस सध्या खूप लोकप्रिय आहेत. हा ड्रेस आरामदायी असून त्याचा फ्लोई लूक स्टायलिश आणि आकर्षक वाटतो.

Cotton One Piece | Pintrest

ब्लॉक प्रिंट कॉटन ड्रेस

राजस्थानी किंवा हाताने छापलेल्या ब्लॉक प्रिंट डिझाइन्स पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मिलाफ देतात. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबत हा ड्रेस अधिक खुलतो.

Cotton One Piece | Pintrest

शर्ट स्टाइल कॉटन वन पीस

शर्ट कॉलर आणि बटण असलेला वन पीस ऑफिस वेअर तसेच सेमी-फॉर्मल लूकसाठी उत्तम पर्याय आहे. यासोबत बेल्ट वापरल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.

Cotton One Piece | Saam Tv

पफ स्लीव्ह किंवा बलून स्लीव्ह ड्रेस

पफ किंवा बलून स्लीव्ह असलेले कॉटन वन पीस सध्या फॅशनमध्ये आहेत. हा ड्रेस साध्या डिझाइनलाही ट्रेंडी आणि क्लासी लूक देतो.

Cotton One Piece | Pintrest

स्टायलिंग टिप्स

पांढरे स्नीकर्स किंवा फ्लॅट सँडल्ससोबत पेअर करा. स्लिंग बॅग किंवा टोट बॅग वापरा. मिनिमल ज्वेलरी आणि हलका मेकअप लूक अधिक आकर्षक बनवतो. पावसाळ्यात हलक्या रंगांऐवजी गडद रंगांचे कॉटन ड्रेस निवडल्यास डाग कमी दिसतात.

Cotton One Piece Designs | Pintrest

Face Care: चेहऱ्यावर ओपन पोअर्स खूप झालेत? मग हा घरगुती सामग्रीने २ मिनिटांसाठी करा मसाज, लगेच दिसेल फरक

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा