ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दूध उकळण्यापूर्वी, धुळीचे सुक्ष्म कण किंवा बारीक कचरा काढून टाकण्यासाठी चाळणीतून दूध गाळून घ्या.
दूध भांड्याच्या तळाला लागू नये म्हणून स्टील किंवा जाड तळाचे भांडे वापरा.
दूध नेहमीच मंद आचेवर गरम करा, जास्त आचेवर दूध गरम केल्यास ते जळू शकते आणि दूधाला जळलेला वास येऊ लागतो.
दूधाची साय भांड्याला चिकटणार नाही म्हणून चमचाने दूध अधूनमधून ढवळत राहा.
दूध उकळू लागताच, गॅसचा फ्लेम कमी करा आणि २ ते ३ मिनिटे शिजू द्या.
दूध उकळल्यानंतर, थंड होण्यासाठी दूधावर स्टीलची चाळण / झाकण ठेवा जेणेकरुन धूळ किंवा कीटक त्यात शिरणार नाही.
एकदा दूध थंड झाले की ते फ्रिजमध्ये ठेवा, यामुळे दूध जास्त काळ ताजे राहते.
नेहमी ताजे दूध वापरा, कारण जुने दूध लवकर नासले जाऊ शकते.