Rohini Gudaghe
कॉर्न सूप करण्यासाठी कॉर्न थोडेसे मीठ टाकून वाफवून घ्या.
वाफवलेल्या स्वीटकॉर्नपैकी अर्धे स्वीटकॉर्नची बारीक पेस्ट करा.
कढईमध्ये बटर टाकून लसूण पाकळ्या, किसलेले अद्रक टाका.
गाजर, कोबी यांचे छोटे- छोटे तुकडे करून परतून घ्या.
यानंतर मिरची, अर्धा कप दुध आणि पाणी टाका.
वाटून घेतलेली कॉर्नची पेस्ट आणि वाफवलेले कॉर्नचे दाणे टाका.
थोडी उकळी आल्यावर चवीनुसार मीठ, जीरे पुड, मीरे पुड आणि साखर टाका.
सूप घट्ट करायचे असेल, तर थोडं कॉर्नफ्लोअर टाका.