Rohini Gudaghe
धन्याचं पाणी बनवण्यासाठी रात्री 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा धणे भिजवा. ते पाणी सकाळी गाळून घ्या. त्यानंतर धन्याचं पाणी तयार होतं.
धणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यात असलेलं अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करते.
धन्याचं पाणी पचनाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास मदत करते. सकाळी ते पाणी पिल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
धन्यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि ए मोठ्या प्रमाणात आहेत. ते केस मजबूत करण्यास आणि वाढण्यास मदत करते.
धन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, बुरशीविरोधी, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. धन्याचं पाणी प्यायल्याने चेहरा चमकदार होतो.
धन्याचं पाणी शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करतं. सकाळी धन्याचं पाणी पिऊन तुम्ही प्रणाली डिटॉक्स करू शकता.
सकाळी धने पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा कायम राहते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.