Shruti Vilas Kadam
दही आणि काकडी दोन्हीही थंड प्रकृतीचे असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देतात.
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीर डिहायड्रेट होण्यापासून वाचतं.
दहीतील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात, तर काकडी हलकी असल्यामुळे पोटाला आराम मिळतो.
या कॉम्बिनेशनमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते
लो कॅलरी आणि हेल्दी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
अतिसंवेदनशील पोट असलेल्या लोकांना एकत्र खाल्ल्यावर गॅस किंवा अपचन होऊ शकतं.
अति प्रमाणात सेवन टाळावं. संतुलित प्रमाणात खाल्ल्यासच याचे पूर्ण फायदे मिळतात.