Shreya Maskar
रजनीकांत यांचा 'कुली' 14 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'कुली'ने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 65 कोटी रुपये कमावले आहेत.
'कुली' चित्रपटाने परदेशात जवळपास 75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन सुमारे 140 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
'कुली' चित्रपटात रजनीकांत, आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार झळकले आहेत.
रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट थिएटर गाजवल्यावर अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेझॉन प्राइम व्हिडिओने 'कुली' चित्रपटाचे ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स 120 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत.
आठ ते नऊ आठवड्यांनंतर 'कुली' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.